माझा महाराष्ट्र बद्दल

नमस्कार,

     www.mazamaharashtra.com या संकेतस्थळावरती भेट दिल्याबद्दल आपले आभार व स्वागत. माझा महाराष्ट्र डॉट कॉम हे संकेतस्थळ सुरू केल्याने आम्हाला खूप आनंद झाला आहे आणि तुम्हीही यामध्ये सहभागी झाल्याबद्दल आमचा आनंद द्विगुणीत झाला आहे.
माझा महाराष्ट्र संकेतस्थळाबद्दल अनेकांच्या प्रतिक्रिया आणि संकल्पनाही मिळाल्या आणि मिळव्यात. आपल्या संकल्पना आणि प्रतिक्रिया या आमच्यासाठी फारच उपयुक्त आणि प्रभावी ठरल्या. त्याचमुळे माझा महाराष्ट्र डॉट कॉम हे संकेतस्थळ मराठी माणसासाठी तयार करू शकलो.
     आपण महाराष्ट्रामध्ये जरी राहत असलो तरी संपूर्ण महाराष्ट्राची माहिती आपणास माहित असते असे नाही. बर्याचदा आपल्याला वेगवेगळ्या विषयाची महाराष्ट्राबद्दलची माहिती हवी असते जसे की महाराष्ट्रातील उद्योग, व्यवसाय, संस्कृती, लोकजीवन, उत्सव, पर्यटन स्थळे, वैद्यकीय सुविधा, कृषिविषयक माहिती, राजकारण, पाककला, भोगोलिक माहिती इत्यादी सारख्या गोष्टींची आवश्यकता नेहमीच जाणवते. परंतु ही सर्व माहिती एका ठिकाणी मिळणे केवळ अशक्य असते. ह्या गोष्टींची गरज लक्षात घेऊन आम्ही ही सुविधा इंटरनेटच्या माध्यमातून देण्याचा विचार केला आणि हे माध्यम आम्हाला योग्य वाटले. यामुळे माझा महाराष्ट्र डॉट कॉम ही संकल्पना पुढे आली.
     माझा महाराष्ट्र हा उपक्रम राबवताना आम्ही महाराष्ट्रातील हे सर्व विषय विचाराधीन केले. आणखी काही राहूनही गेले असतील. आपल्या प्रतिक्रिया आणि आपला सल्ला या माध्यमातून आम्ही त्या पूर्ण करण्याचा नक्कीच प्रयत्न करू त्यासाठी आम्हाला तुमच्या प्रोत्साहनाची आवश्यकता आहे.
     आम्हाला आशा आहे की तुम्हाला हे संकेतस्थळ नक्कीच आवडेल. आणखी काही उपयोगी माहिती यामध्ये समाविष्ट करावयाची असेल तर तुम्ही आम्हाला info@mazamaharashtra.com या ईमेल द्वारे किंवा दूरध्वनी द्वारे संपर्क करू शकता.
धन्यवाद !